मुखेड येथील नर्सिंग कॉलेजची मान्यता रद्द ची मागणी

आज उपोषण चा ५ वा दिवस
नांदेड/प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील शिवप्रसाद नर्सिग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्काची ची मागणी व त्यासंस्थे मध्ये गरीब विद्यार्थ्यांना अरे रावीची भाषा केली जाते. दिव्यांग विद्यार्थीनीना अपमानास्पद वागणूक दिली आहे. म्हणून मान्यता रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर ३ जन बेमुदत उपोषणला बसले आहेत. आजचा हा उपोषण चा ५ वा दिवस आहे
मुखेड तालुक्यातील शिव प्रसाद नर्सिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावे. तसेच यासंस्थेमध्ये गरीब विद्याथ्यांना अरे रावीची भाषा केली जाते. दिव्यांग विद्यार्थिनी कोमल गेंदाजी ननुरे यास अपमानास्पद वागणूक प्राचार्य डॉ. वीरभद्र हिमगिरे यांनी दिली आहे. नर्सिंग पास द्वितीय वर्षाचे मार्क मेमोप्रमाणपत्र ननुरे या विद्यार्थिनी मागितले असता ती प्रमाणपत्रे, मार्क मेमो आमच्याकडे नाही तू मुंबईला जाऊन चौकशी करावी अशा उद्धट भाषेत प्राचार्य यांनी बोललेले आहे. म्हणून त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावे या मागणीसाठी नितीन तलवारे सह अनेक जण बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ दिवसा पासून सुरू आहे. आध्यप प्रशासनाने कोनतीच दखल घेतली नसल्याचे उपोषन कर्तानी सागीतले सदर निवेदनावर नितिन तलवारे, रमेश गायकवाड, सुनिल तोटरे आदीच्या सह्या आहेत.



