मनोज जरांगेंच्या आंदोलनात शोककळा; अंतरवाली सराटीत ४० वर्षीय आंदोलकाचा मृत्यू

◽️आंदोलनस्थळी अचानक प्रकृती खालावल्याने दुर्दैवी अंत
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क बीड:- ०३ सप्टेंबर २६
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या ४० वर्षीय दशरथ रायकर यांचाअंतरवाली सराटीत मृत्यू झाला.
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सहावादिवस आहे. दीर्घकाळ चाललेल्या उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली आहे, तर राज्यभरातूनहजारो समाजबांधव पाठिंबा दर्शवण्यासाठी अंतरवाली सराटी येथे येत आहेत. मराठा आरक्षणाच्याआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका ४० वर्षीय मराठा आंदोलकाचा उपोषणस्थळीच दुर्दैवीमृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृत आंदोलकाची ओळख दशरथ रायकर (वय ४०, रा. संगम, जिल्हा बीड) अशी आहे. प्राथमिकमाहितीनुसार, तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अंतरवाली सराटी आणिसंपूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दशरथ रायकर हे देखील आंदोलनात सहभागी होण्यासाठीआणि जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आले होते.
मात्र, आंदोलनाच्या ठिकाणी असताना रायकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते खालीकोसळले. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती आणि पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका निष्ठावान आंदोलकाचा मृत्यू, यांमुळे अंतरवाली सराटी येथे अत्यंत भावूक आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्दैवी घटनेच्या बातमीमुळे बीड जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव आणि मराठा आंदोलक समुदायावर शोककळा पसरली आहे.



