सामाजिक

मौजे केरुर येथे  शूरवीर छावा…’ छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी

मुखेड प्रतिनिधी:- 

शत्रु देखील मरतांना ज्यांच कौतुक करून गेला असे धर्मवीर  छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तालुक्यातील मौजे केरूर येथे  उत्साहात साजरी करण्यात आलीग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराजांच्या प्रतिमेचेपूजन करून नियोजित स्मारक स्थळाचे अनावरण करण्यात आले.

दि १४ मे रोजी मौजे केरुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गोविंद शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले  नियोजित जागेचे अनावरण समस्त केरूर वासियाच्या वतीने करण्यात आले स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी चालून येणाऱ्या औरंगजेबाशी छत्रपती संभाजी महाराजानी अखेरपर्यंत लढा देत स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळली लोककल्याणकारी योजनांद्वारे प्रजेचे हित जोपासलेअनेक भाषांवर प्रभुत्व असणारे बुद्धी आणि शोर्याचा अदभूत संगम असणाऱ्या एकही युद्धनहरणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर गिरीधर पाटील यांनी प्रकाशझोत टाकलायाप्रसंगी किसन पाटील,गिरीधर पाटील ,गजानन पाटील ,दत्ता पाटील ,महेश पाटील ,दिपक पाटील ,विष्णूशिंदे ,हानमत शिंदे ,सम्रत पाटील  ,शेषराव पाटील ,महेश शिंदे ,हनुमंत शिंदे ,वेंकट शिंदे ,राजेश शिंदे,दीपक शिंदे ,दीपक कानडे ,संतोष शिंदे ,ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button