दहावीच्या परिक्षेत श्रेया वाघमारेला मिळाले ९८.६० टक्के गूण

मुखेड / प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल दि.१३ मे रोजी दुपारी ०१ वाजता जाहीर झाला.या निकालात मुखेड शहरातील ब्राईटस्टार इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी श्रेया संजय वाघमारे हिने ९८.६० % टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यशसंपादन करीत ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलचा यश मिळविला आहे या यशाबद्दल श्रेयाचे सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.
नुकतच दिनांक १३ में रोजी दहावीच्या परिक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने परिक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर झाला त्यामध्ये शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल व विश्व हिंदु परिषदेचे सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे याची कन्या श्रेया वाघमारे या विद्यार्थ्यांनीने परिक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन करीत ९८.६० टक्के गुण मिळविले आहे.यात त्याला मराठी विषयात ९७,संस्कृत विषयात ९७, इग्लिंश ९३, गणित १००, विज्ञान आणी तंत्रज्ञान ९६ व सामाजिकशास्त्रे ९६ गुणमिळाले आहेत. श्रेयाने या यशाचे सर्व श्रेय शिक्षक, शिक्षिका,आजी,आई,वडील व मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच गुरुजणांना दिले आहे.या यशाबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,आमदार डाॅ.तुषार राठोड,माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी आमदार अविनाशघाटे,माजी आमदार सुभाष साबणे,माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड,माजी शिक्षण सभापती व्यंकटरावपाटील गोजेगावकर,माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, प.स.चे माजी उपसभापती सुभाष पाटीलदापकेकर, माजी जि.प.सदस्य संतोष बोनलेवाड, गटविकास अधिकारी सि.एल.रामोड,गटशिक्षणअधिकारी कैलास होनधरणे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे,माजीनगरसेवक राहुल लोहबंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी पा.सकनुरकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजुपाटील रावणगावकर,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबुरावकदम,भाजपा शहर मंडळ अध्यक्ष नागनाथ लोखंडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकरावगजलवाड,शिक्षण विस्तार अधिकारी डाॅ.शिवाजी कराळे,शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीरावयेवतीकर,शिक्षण विस्तार अधिकारी उत्तम चव्हाण, संपादक असद बल्खी, राष्ट्रवादीचे जयभिमसोनकांबळे,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रेयाचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.




