सामाजिक

विकलांग विधवा सेवा समिती च्या मराठवाडा उपाध्यक्षपदी बाळासाहेब कांबळे सलगरकर यांची निवड.

मुखेड प्रतिनिधी :- २४ जून २५

राष्ट्रीय विकलांग विधवा सेवा संघटना ही विकलांग व विधवा महिला भगिनी दिव्यांग बांधव यांच्या हक्क अधिकारांसाठी देशभरात महत्त्वपूर्ण असे कार्य करणारी आक्रमक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून देशातील व राज्यातील विविध भागातील अनेक विकलांग बांधव भगिनी,विधवा भगिनी सह दिव्यांग बांधवांचे अनेक समस्या या संघटनेच्या माध्यमातून सोडवून अनेक विकलांग आणि विधवा महिला भगिनींना या संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या संघटनेचे राज्यभरासह मराठवाड्यात कार्य व संघटन वाढावे आणि या भागातील अनेक विकलांग विधवा महिला भगिनी व पुरुष बांधवांचे विविध समस्या चे निराकरण
व्हावे. या उद्दात हेतूने बाळासाहेब कांबळे सलगरकर यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना नुकतेच संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्र देण्यात आले.
बाळासाहेब कांबळे सलगरकर यांच्या निवडीबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्ह्याकार्याध्यक्ष
निर्भीड पत्रकार तथा संपादक भारत सोनकांबळे यांनी त्यांच्या निवडीबद्दल
शुभेच्छा संदेशाद्वारे कांबळे यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास मंगल सदिच्छा दिल्या.तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक,शैक्षणीक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून बाळासाहेब कांबळे सलगरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना सर्वच क्षेत्रातून पुढील कार्यास सदिच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button