सामाजिक

आठ दिवस मृत्युशी झुंज देत अखेर बालाजी गायकवाड तांदळीकर  यांचे निधन

मुखेड / प्रतिनिधी. ०८ जुलै २५ 

       दि २८ जून रोजी मुखेडनरसी राज्य महार्गावरील बजरंगनगर शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाच्या जवळ एका दुचाकी  कारचा भिषण अपघात झाला होता त्यात .बालाजी गणपती गायकवाड तांदळीकरमीस्त्री ,) आठ दिवस मृत्युशी झुंज देत अखेर आज दुपारी दोन वाजता निधन झाले आहे.

    मुखेड तालुक्यातील तांदळी येथील  बालाजी गणपती गायकवाड  मारोती भुजंग जाभंळीकर राहणार जाभंळी हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच.२६ सीसी ६५२९ या दुचाकीवरुन मिस्त्री बांधकामासाठी रातोळीटाकळी येथे जात होते तेव्हां मुखेड शहरालगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मुखेडनरसी राज्यमहामार्गावरुन मुखेडकडे येणाऱ्या हुंदाई ग्रँन्ड आयटेन कार क्रमांक एमएच २९ .एम.०४४८ या कारचा वदुचाकीचा समोरासमोर धडक होवुन भिषण अपघात झाल्यामुळे या अपघातात दुचाकीवरील बालाजीगणपती गायकवाड वय ४३ वर्ष रा.तांदळी  मारोती भुजंग जाभंळीकर वय ३२ वर्ष राहणार जाभंळी हेदोघेजण गंभीर जखमी झाले होते त्या दोघांचा उपचार नांदेड येथे चालू होता त्या उपचार दरम्यान बालाजीगणपती गायकवाड तांदळीकर यांचे दुपारी २ वाजता निधन झाले.बालाजी गायकवाड हे.भाजपा बुथ प्रमुख दशरथ गायकवाड चेअरमन यांचे छोटे बंधु आहेत.

अंत्यविधी आज संध्याकाळी ठीक 8 वाजता तांदळी ता.मुखेड येथे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button