रमी मध्ये हरला, बीडचा ASI चोर बनला, आधी SP कार्यालयात बॅटरी चोरल्या, आता दुचाकी चोरताना सापडला!

▫️बॅटरींची चोरी केल्यानंतर अमित सुतार यांचं केलं होतं निलंबन
▫️दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी
बीड:- ०८ जुलै २५
बीडमध्ये पोलीस कर्मचारीच चोर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रीम ११, रमी ॲपमध्ये पैसे बुडाल्यामुळं लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केली आहे.
बीडमध्ये पोलीस कर्मचारीच चोर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रीम ११, रमी ॲपमध्ये पैसे बुडाल्यामुळं लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केलीआहे. यापूर्वी देखील या पोलिसाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच ५८ बॅटऱ्यांची चोरी केली होती. अमित मधुकर सुतार असं त्याचं नाव असून ते बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकम्हणून कार्यरत होते.
२०२४ मध्ये इन्वर्टरसाठी लागणाऱ्या १० बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी त्याच्या विरोधात बीड शहर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेला वर्ष उलटत नाही, तोच सुतार याने आणखी एक कारनामाकरत दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलअसून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आलं आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयातून बॅटरींची चोरी केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अमितसुतार याचे निलंबन केले होते. तो सध्या जामिनावर बाहेर होता. परंतू, अमित सुतारला ऑनलाइन जुगार, दारु, गेम खेळण्याचा छंद होता. यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते. काही लोकांकडून कर्जही घेतले हेपैसे परत करण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग अवलंबवा होता. दरम्यान पोलीसच चोर बनल्याने या प्रकाराचीजिल्हाभरात चर्चा सुरु आहे.



