Uncategorized

ओबिसी बहुजन मोर्चा राज्यातील सर्व लोकसभेच्या जागा लढविणार – ॲड. भोसीकर


प्रस्थापितांच्या गुलामगिरीत ओबीसी समाज राहणार नाही नांदेड – ओबीसी समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ओबीसी बहुजन मोर्चा या पक्षाची स्थापना करण्यात आली असून हा पक्ष राज्यातील लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढविणार असल्याचे मत अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ओबीसी समाजासाठी स्थापना करण्यात आलेल्या ओबीसी बहुजन मोर्चा या पक्षाची अधिकृत घोषणा करण्यासाठी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेमध्ये मराठवाडा अध्यक्ष ॲड. अविनाश भोसीकर यांनी ओबीसी बहुजन मोर्चा हा राजकीय पक्ष बहुजन समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आला असल्याचे सांगितले.
ओबीसी समाजाचे राजकीय क्षेत्रामध्ये ५१ टक्के प्रमाण असून ओबीसी समाजाची मते घेऊन प्रास्थापित राजकीय पुढार्‍यांनी सत्ता भोगत आहिट परंतु ओबीसीचा विकास त्यांनी केला नाही. त्यामुळे ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाची बैठक मुंबई येथे पार पडली असून या बैठकीमध्ये ओबीसी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला असून ओबीसी बहुजन मोर्चा असे पक्षाचे नाव असून हा पक्ष महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागा आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवून ओबीसी समाजाचे स्वतंत्र नेतृत्व तयार करण्याची प्रक्रिया चालू झाली असून प्रस्थापितांना दूर करण्यासाठी ओबीसी बहुजन मोर्चा पक्षाची स्थापना करण्यात आली असून मला मराठवाड्यात तीन पक्षाचे संघटन मजबूत करण्याची जबाबदारी शिकविली आहे असे ॲड. अविनाश भोसीकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button