महाराष्ट्राचे शूर : पुत्र देगलूर तालुक्यातील सचिन वनंजे काश्मीर मध्ये शहीद

अत्यविधी दि ९ मे रोजी सकाळी १० वाजता देगलूर येथे होणार
देगलूर प्रतिनिधी:-
काश्मीरच्या तुफानी थंडीमध्ये देशसेवेचे व्रत जोपासणारे तमलूर (ता. देगलूर) गावचे सुपुत्र जवान सचिन यादव वनंजे (वय ३०) यांनी दि ७ मे २५ रोजी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. दुपारी १२ ते १ च्यासुमारास ड्युटीवर असताना त्यांचे वीरमरण झाले. या दुःखद घटनेने संपूर्ण देगलूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
शहीद सचिन वनंजे हे लहानपणा पासूनच राष्ट्र सेवेसाठी प्रेरित होते. देशभक्तीची ठिणगी त्यांच्या। मनातलहान वयातच चेतली होती. त्यांनी भारतीय सैन्यदलात भरती होऊन अनेक वर्षे देशसेवा केली. कर्तव्य परायणता आणि शिस्त हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्य गुण होते.
वनंजे यांचे पार्थिव आज रात्री उशीरा काश्मीर मधून त्यांच्या राहत्या घरी आणले जाईल व अत्यविधी दि ९ मे २५ रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती शहीद सचिन वनंजे यांचे मोठे बंधू दयानंद वनंजे यांनी अधिकृत असे कळवले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, आठ महिन्यांची चिमुकली मुलगी, दोन भाऊ आणि आई–वडील असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याग आणि बलिदान हेच खरे शौर्याचे प्रतीक असते.
सचिन वनंजे यांनी आपल्या प्राणांची आहती देऊन देशासाठी अजरामर इतिहास लिहिला. त्यांचे नावआणि त्यांचे शौर्य कधीही विसरले जाणार नाही. तमलूर गावाचा हा वीरपुत्र कायमच्या स्मृतीत राहील.
जगातील सर्वात आव्हानात्मक क्षेत्रात अटळ समर्पणाने देशाची सेवा करणाऱ्या महाराष्ट्राच्या या सुपुत्राला श्रमिक एकता न्यूज़ परिवाराच्या वतीने आखेरचा सलाम.



