सामाजिक

भारत सोनकांबळे यांनी सार्वजानिक बांधकाम उपविभागाकडे केलेल्या रस्ता दुरुस्तीच्या पाठपुराव्याला यश

मुखेड/ १८ जुलै २५

तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील नंदगाव पाटी ते कर्णा फाटा दरम्यानचा रस्ता अतिशय खड्डेमय झाला असून या रस्त्यावर अक्षरश: खड्डे खडे पडून ह्या रस्त्याची चाळण झालेली आहे, सद्यस्थितीत हा रस्ता प्रवाशांचा जीवघेणा बनला आहे. या रस्त्यावरून वाहतुकीची रहदारी वाढली असून जास्त वजनाच्या गाड्या या रस्त्यावरून जात असल्याने रोड (रस्ता) पूर्णतः उखडून गेला आहे. सद्या पावसाळा (मान्सून ऋतू) सुरू असून या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून खड्डे भरल्या जात आहेत.तसेच या रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्यामुळे मोठा अपघात होण्याची व मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची दाट शक्यता असल्याने बेटमोगरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा निर्भीड पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी दि.२१ मे २०२५ रोजी मा.कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तात्काळ हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन देवून सदर दिलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेवून सलगरा फाटा ते बेटमोगरा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील नंदगाव पाटी ते कर्णा फाटा दरम्यानचा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अन्यथा सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संबंधित विभागाला निवेदनाद्वारे दिला होता.
पत्रकार भारत सोनकांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड कडे हा रस्ता दुरुस्त करण्याच्या बाबतीत दिलेल्या निवेदनाची संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड यांनी तात्काळ दखल घेत या रस्त्याचे काम मंजूर करून घेतले असल्याचे व या कामाचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी विभागीय कार्यालयाकडे सादर केले असल्याचे लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लवकरच या रस्त्याचे दुरुस्तीकरण होणार असल्याचे लेखी पत्र संबंधित प्रशासनाकडून प्राप्त झाल आहे.


पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता भारत सोनकांबळे यांनी
दिलेल्या निवेदनाची दखल घेवून सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्ता वरील नदंगाव पाटी ते कर्णा फाटा दरम्यानचा रस्ता दुरुस्तीच्या कामाची मंजुरी घेतली असून कामाचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी विभागीय कार्यालयाकडे सादर केले आहे. लवकरच तांत्रिक मान्यता मिळाली की कामाचे टेंडर प्रक्रिया होईल. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्या बरोबर प्रात्यक्षिकरित्या रस्ता दुरुस्तीच्या कामाची सुरूवात होईल.

सावन कासलीवाल
उपविभागीय अभियंता
सार्वजनिक बांधकाम उपविभाग,मुखेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button