परिचारिकांचे ‘कामबंद’ आंदोलन:रुग्णेसवा विस्कळीत; नेत्र शस्त्रक्रिया शिबिर रद्द

▫️आंदोलनचा आजचा चौथा दिवस
मुखेड : प्रतिनिधी २० जुलै २५
विविध मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या राज्यातील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांच्या मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी गुरूवारी कामबंद आंदोलन केले. याचा परिणाम आरोग्य सेवेवर पडत असून, शुक्रवारी असलेल्या नेत्र शस्त्रक्रिया शिबिर रद्द झाले आहे. या संपात १७ अधिपरिचारिका व ३ पुरुष अधिपरिचारक सहभागी झाल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे..
उपजिल्हा रुग्णालयात १७ जुलैपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून कामबंद आंदोलन होत आहे. वेतन त्रुटी निवारण ज्यात बक्षी समिती खंड २ तसेच खुल्लर समितीनुसार अधिपरिचारिका, परिसेविकाही प्रत्यक्ष रुग्णसेवा देणारी पदे आहेत. या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारणकरुन इतर पदाप्रमाणे या पदांना वेतनवाढ करावी. केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांना नर्सिंग भत्ता व गणवेश भत्ता लागू करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये विजय कोनापुरे, मनीषा पुंडे, एन. सोनकांबळे, एस. वासमवाड, ऐश्वर्या जमादार, व्ही. पांचाळ, जिजा गायकवाड, एस. सोनवणे, एस. सूर्यवंशी, पी. ईबितदार, संदेश पावरा, योगेश पावरा, ए. गोटमुखले, संगीता यलमवाड ,श्रीरामे एस,इंगळे पी सहपरिचारिका या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.



