शैक्षणिक

शिक्षकांनी इंग्रजी,गणित विषयासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत.

मुखेड / प्रतिनिधी.

अध्ययन स्तर निश्चिती करून सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून कठीण संकल्पनांचे कृतिशील अध्यापन कसे करावे याचे विचार मंथन करण्याचे एक सशक्त व्यासपीठ म्हणजे शिक्षण परिषद होय.बदलत्या काळाची गरज आणि आव्हाने ओळखून शिक्षकांनी आपल्या अध्ययन, अध्यापन पद्धतीमध्ये समर्पक बदल करून इंग्रजी,गणित विषयासह इतर विषयाच्या  गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी नियमित प्रयत्न करावेत असे आवाहन दि.१९ डिसेंबर रोजी मुखेड तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे यांनी डोरनाळी जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत आयोजीत शिक्षण परिषदेत बोलताना केले आहे.
  शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी सरपंच प्रतिनिधी हुल्लाजी पाटील शिंदे हे होते तर उदघाटक म्हणुन मुखेड तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे,प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी नागनाथ द्याडे,केंद्रप्रमुख रविकुमार कामन्ना,तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील शिंदे, उपसरपंच प्र.रावसाहेब पाटील शिंदे,रमाकांत पाटील शिंदे, पोलिस पाटील मंगलताई शिंदे, ग्रा.पं.सदस्या महानंदा शिंदे, सोसायटीचे संचालक व्यंकटराव पा.कंठाळे,जि.प.मुलींचे हायस्कूल मुखेड प्रशालेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेताब शेख,विषयतज्ञ विलास जाधव,विषयशिक्षक आख्तर दायमी, दत्तात्रय सगर सह डोरनाळी जि.प.शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी केंद्रातील अपार आयडीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या मुख्याध्यापक यांचा गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिद्धेश्वर कोट्टे यांनी केले तर प्रस्ताविक केंद्रप्रमुख रविकुमार कामन्ना यांनी केले.उपस्थितांचे आभार डोरनाळी केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक प्रभुनाथ देशमुख यांनी मानले,व्यवस्थापनाची जबाबदारी सहशिक्षक लवकुश सुरनर यांनी सांभाळली.सदर शिक्षण परिषदेस डोरनाळी केद्रांतील सर्व शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, आशावर्कर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक,महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक प्रभुनाथ देशमुख, सहशिक्षक लवकुश सुरनर, मदतनीस रंजना गुडमेवाड, रोजगार सेवक मस्तान शेख सह अनेकजण परिश्रम घेतले.शिक्षण परिषदेदरम्यान उपस्थित सर्व मान्यवर,शिक्षण विभागाचे अधिकारी,मुख्याध्यापक व शिक्षकांचे आयोजकाच्या वतीने सत्कार करण्यात आले.कार्यक्रम समारोपानंतर सर्वांसाठी स्वरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button