संपादकीय

कलम आणि कायद्याचा बुलंद आवाज : ॲड. संदीप अण्णा कामशेट्टे

पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून तो समाजाचा आरसा आहेहा आरसा स्वच्छ ठेवण्याचे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम जे मोजके लोक निष्ठेने करतातत्यामध्ये ‘दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी ॲड. संदीप अण्णा कामशेट्टे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जातेआज त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा छोटासा आढावा.

संदीप अण्णा हे केवळ एक पत्रकार नाहीततर ते कायद्याचे जाणकार (एडव्होकेटदेखील आहेतत्यांच्याकडे असलेल्या कायदेशीर ज्ञानामुळे त्यांच्या बातम्यांमध्ये एक वेगळीच खोली आणि अचूक ताजाणवतेअन्यायाविरुद्ध लढताना कायद्याची ढाल आणि लेखणीची तलवार कशी वापरावीयाचे उत्तम उदाहरण म्हणजे अण्णांची कार्यशैली होय.

तालुका प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी कधीही सत्तेसमोर गुडघे टेकले नाहीतमग तो प्रश्न लेडीचा असो रेल्वेचा व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा असोगावातील रस्त्यांचा असो किंवा सर्वसामान्यांच्या नागरी सुविधांचाअण्णांनी नेहमीच आपल्या लेखणीतून प्रशासनाला जाब विचारला आहे. ‘पुण्यनगरीच्यामाध्यमातून त्यांनी मांडलेले प्रश्न केवळ कागदावर  राहतामार्गी लागेपर्यंत त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आहे.

कामाच्या व्यापातही संदीप अण्णांनी माणसे जोडण्याचे कसब जपले आहे. ‘अण्णा‘ या नावाला साजेसात्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि मदतीला धावून जाणारा आहेनव्या दमाच्या पत्रकारांसाठी ते नेहमीच मार्गदर्शक राहिले आहेतसमाजातील प्रत्येक घटकाशी त्यांचा थेट संपर्क असूनलोकांच्या सुखदुःखातते नेहमी हिरीरीने सहभागी होतात.

आजच्या धावपळीच्या आणि आव्हानात्मक काळात संदीप अण्णां सारख्या स्पष्ट वक्त्या आणि अभ्यासू पत्रकाराची समाजाला नितांत गरज आहेत्यांनी पत्रकारितेचे मूल्य जोपासत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

एड. संदीप अण्णा कामशेट्टे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य लाभोहीच ईश्वरचरणी प्रार्थनात्यांच्या लेखणीची धार अशीच कायम राहो आणि त्यांच्या हातून समाजहित सदैव घडत राहो!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अण्णा!

संपादक :- भाई आसद इब्राहिम बल्खी 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button