डॉ. दिलीप पुंडे यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समितीवर निवड

▫️सर्पदंश प्रतिबंधासाठी डॉ. दिलीप पुंडे आता देणार केंद्र सरकारला सल्ला; मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब
मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ०९ मे २६
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) सर्पदंश प्रतिबंध व नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रमासाठी (NPSE) राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समिती (NTAC) गठीत केली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित राष्ट्रीय समितीवर मुखेड भूषण मा. डॉ. दिलीप पुंडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
सर्पदंश उपचारातील त्यांचे प्रदीर्घ अनुभव आणि सामाजिक योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांचीया समितीवर नियुक्ती केली आहे. ग्रामीण भागात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणि याविषयावर राष्ट्रीय धोरण आखण्यासाठी ही समिती कार्य करते.
डॉ. पुंडे यांच्या या निवडीमुळे मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या याराष्ट्रीय स्तरावरील नियुक्तीबद्दल राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.




