भाजपला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, माजी मंत्री खा.भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसवासी

नांदेड प्रतिनिधी:-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटकाबसताना दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्कररावपाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केलीआहे.
भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपातप्रवेश केला होता. पण आता त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचेज्येष्ठ नेते अमित देशमुख यांना मोठं यश आलं आहे. त्यामुळे भास्करराव खतगावकर यांनी आज अखेरकाँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार तथा माजी महापौर ओमप्रकाश पोकर्णायांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचे आता ताकद वाढली आहे. कारण याबड्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेश केल्यानंतरभास्करराव खतगावकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली



