सामाजिक

मुखेडमध्ये वाळू माफियांचा हैदोस; प्रशासन झोपेत? संयुक्त पथक नेमून तात्काळ कठोर कारवाईची मागणी

मुखेड (प्रतिनिधी) –  ४ मार्च २६

मुखेड शहरातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावीअशी मागणी सचिन इंगोले यांनी प्रशासनाकडे केली आहेया संदर्भात आज दि ०४ मार्च रोजी त्यांनी सविस्तर निवेदन सादर केले आहे.

निवेदनानुसारमुखेड शहरातून लातूरउदगीरशिरूर ताजबंदजांब बु., बाहेरहाळी रोडसलगरा तसेच खरबखंडगावचांडोळा मार्गे शेकडो टिप्परद्वारे वाळूची वाहतूक केली जात आहेअनेक टिप्पर एकाच पावतीवर दोनदोन वेळा दहा ते बारा ब्रास क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून शासनाचा महसूल बुडवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर टिप्पर भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहेनियमानुसार वाळू वाहतूक सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापूर्वी या कालावधीतच करणे अपेक्षित असतानासंबंधितांकडून दिवसरात्र २४ तास वाहतूक सुरू असल्याचे निवेदनात नमूदकरण्यात आले आहेकाही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

यासोबतचमुखेड तहसील अंतर्गत महसूल विभागाने मौजे सलगरा फाटाकमळेवाडी फाटा  जांब येथे महसूल  पोलीस विभागाचे संयुक्त तपासणी पथक तात्काळ बसवावेअशी मागणी करण्यात आलीआहेया संयुक्त पथकाकडून लाल  काळी रेती वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांच्या पावत्या तपासाव्याततसेच आरटीओ नियमांनुसार वाहनांची सर्व कागदपत्रे तपासून वाहनांचे वजन काट्यावर मोजमाप करण्यात यावे.

क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वाहतूक करणाऱ्यानियमबाह्य पद्धतीने वाहतूक करणाऱ्या तसेच एकाचपावतीवर दोनदोन वेळेस वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांवर  संबंधित वाळू माफियांवर दंडात्मक कठोर कारवाई करण्यात यावीअशी ठाम मागणी इंगोले यांनी केली आहे.

प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अवैध वाळू वाहतूक पूर्णपणे बंद करावीअन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईलअसा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

या वेळी शाम प्रदिपराव इंगोले, शंकर वडेवार, बालाजी कुटे , मनोज इंगोले, सुमित इंगोले, योगेश जाधव, सलमान पठाण, राजु कोनापुरे, दिपक जुन्ने आदी सामाजिक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button