राजकीय

‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल्स… नगरसेवकांची सहल जोरात!

मुखेड: “काय झाडीकाय डोंगरकाय हॉटेल्स… सगळं ओक्के मध्ये हाय!” या प्रसिद्ध वाक्याची प्रचिती सध्या नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने येत आहेस्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जशी तापू लागली आहेतसे राजकीय वातावरण चांगलेच रंगले असूनमुखेड शहरातील बहुतांश नगरसेवक सध्या सहलीवर (टूरगेल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेतील (महायुतीबहुतांश नगरसेवक सहलीवर गेल्याचे समजतेविशेष म्हणजेजे नेते आणि नगरसेवक स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असताततेच आता निवडणुकीच्या निमित्ताने ‘एकाच गाडीत‘ बसून सहलीचा आनंद घेत आहेत.

दुसरीकडेआपल्या नेत्यांना एकत्र पाहून जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा संभ्रमआणि नाराजी पाहायला मिळत आहे. “नेते एकत्र झालेपण कार्यकर्त्यांत मात्र दुरावाच राहिला,” अशी भावना सध्या मुखेडच्या राजकीय गल्लीबोळांत ऐकायला मिळत आहे.

नगरसेवक सहलीवर असताना शहरात मात्र समस्यांचा डोंगर साचला आहेमुखेड नगर परिषदेला अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळालेला नाहीसध्या देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्याकडे मुखेडचा अतिरिक्त पदभार आहेज्यामुळे प्रशासकीय निर्णयांना विलंब होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

अनेक प्रभागांत नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना खाजगी टँकरवर अवलंबून राहावेलागत आहे.

 शहरातील कचऱ्याचे ढीग आणि तुंबलेल्या गटारींमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मूलभूत सुविधांच्या कामात अपेक्षित प्रगती झालेली नाही.

एककीकडे निवडणुकीचे ‘मैनेजमेंट‘ करण्यासाठी नगरसेवक निसर्गरम्य ठिकाणी हॉटेलचा आनंद घेत असतानादुसरीकडे सामान्य नागरिक मात्र रस्तेपाणी आणि स्वच्छते सारख्या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे डोळे लावून बसले आहेतआता ही ‘सहल‘ निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम करते आणि नगरसेवक परतल्यावर शहराच्या प्रश्नांकडे लक्ष देतात काहे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button