प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या मुखेड आगार प्रमुखावर कार्यवाहीची मागणी.

शेकाप व रिपब्लिकन सेनेचे विभागीय नियंत्रक म .रा .प.म नांदेड यांना निवेदन
मुखेड /प्रतिनिधी
मुखेड आगारात कार्यरत आगार प्रमुख सुभाष पवार यांचे आगार कामकाजात लक्ष नसल्याने चालक वाहक मनमाणी पद्धतीने कामावर येणे वेळेवर बस सोडत नसल्याने प्रवाशांचीl गैरसोय होत असल्याची तक्रार दि २० मार्च रोजी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती सदस्य भाई आसद बल्खी व रिपब्लिकन सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे यांनी विभागीय नियंत्रक नांदेड यांच्याकडे केली आहे
मुखेड येथील आगार प्रमुख श्री सुभाष पवार हे मुखेड येथे आले तेव्हा पासुन ते आजतागायत त्याचे आगार कामकाजात लक्ष नसल्याने नियमित वेळा पत्रका नुसार सुटणाऱ्या गड्या ह्या १ ते २ तास उशीराने सृटत असुन, चालक वाहक ड्यूटीवर मनमर्जी प्रमाणे येत असून, या चालक वाहक यांच्या कडे लक्ष देण्यासाठी आगार प्रमुखला वेळ नाही ते आगाराचे कामकाज मोबाईल फोनवरुन पाहत असल्याने आगारावर नियंत्रण राहिलेला दिसत नाही या मुळे चालक वाहक यांच्या निष्काळजी पणे मुळे बसेस हे वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशाची अत्यंत गैरसोय व बेहाल होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
आगारात कार्यरत सुभाष पवार यांच्यावर कार्यवाही करून त्यांची मुखेड येथुन तात्काळ बदली करावीअन्यथा आपले कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असाही इशारा शेकाप पक्ष व रिपब्लिकन सेना यांच्या कडून देण्यात आला



