सामाजिक

नंदनवन येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घराला आग ;कुटुंब बेघर  मदतीची मागणी 

कौठा प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील नंदनवन येथील अल्पभूधारक शेतकरी मोहन गोविंदराव भागानगरे यांचे राहत्या घरात दिनांक 17 रोजी दुपारी अचानक आग लागून संसार उपयोगी वस्तू ,अन्नधान्यआवश्यक साहित्य जळूनखाक झाले आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे कीनंदनवन येथील शेतकरी घरास कुलूप लावून शेताकडे कामासाठी गेलेअसता दिनांक 17 रोजी दुपारी घरास अचानक आग लागली गावकऱ्यांनी आग  विझवण्याचा  प्रयत्न केलातोपर्यंत घरातील टीव्हीअन्नधान्यकुलर ,फ्रीज ,सोफा सेटशेतीमाल जळून खाक झाले असून अंदाजे सात लाखाचे नुकसान झाले .जीवित हानी झाली नाही आगीचे कारण समजू शकले नाही .

घटनेचा पंचनामा नंदनवन सज्जाचे तलाठी श्री कापसे यांनी केला.सध्या मोहन भागानगरे यांचे कुटुंब उघड्यावर असून शासनाने त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button