दुःखद वार्ता: सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी शेख गुलाब यांचे निधन

मुखेड/हळणी: दि १८ फेब्रुवारी २६
सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी शेख गुलाब यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनानेकुटुंबीयांवर तसेच सामाजिक ,शासकीय क्षेत्रात व हळणी परिसरात शोककळा पसरली आहे.
शेख गुलाब यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य केले. महसूल विभागात सहायकमहसूल अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळत जनतेची सेवा केली. त्यांच्या कामातीलपारदर्शकता, कर्तव्यदक्षता आणि साधेपणा यामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला आणि समाजातील विविध उपक्रमांनापाठिंबा दिला. त्यांच्या निधनामुळे समाजाने एक कर्तव्यनिष्ठ व सज्जन व्यक्तिमत्व गमावले आहे.
त्यांच्या आठवणी स्मृतीसुगंधासारख्या नेहमीच सर्वांच्या मनात जिवंत राहतील.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच श्रमिक एकता न्यूज परिवाराकडून प्रार्थना अंत्यविधी स्थळ मुळगाव हळणी येथे आज दि १८ फेब्रुवारी सायंकाळी ०३:०० वाजता. होणार आहे



