शैक्षणिक

सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यात सेंट मेरी इंग्लिश स्कूलला द्वितीय पारितोषिक

मुखेड प्रतिनिधी:- २० फेब्रुवारी २६
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त आज मुखेड येथील शिवस्मारक परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची अत्यंत उत्साहात सांगता झाली. याच सोहळ्याचे औचित्य साधून शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सेंट मेरी इंग्लिश स्कूल मुखेड या शाळेने सामुहिक नृत्य सादरीकरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे सामुहिक नृत्य स्पर्धेत बक्षीस मिळवणारी ही शहरातील एकमेव इंग्लिश स्कूल ठरली.
ऑपरेशन सिंदूर या देशभक्तीपर गीतावर अत्यंत मार्मिक भाष्य करतानाचे नृत्य शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर करुन उपस्थित सर्व मान्यवरांना आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकले. देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सैनिकांना हे गित समर्पित असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनम वंटेकर मॅडम यांनी सांगितले.
याप्रसंगी मुखेड कंधार विधानसभेचे आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना आणि शाळेचे संचालक प्राध्यापक महेश वंटेकर सर यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले यावेळी तहसीलदार मा. राजेश जाधव साहेब, पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे, विधानसभा प्रमुख खुशालराव पाटील उमरदरीकर, माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड सह शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप गटनेते नागनाथ लोखंडे, नगरसेवक विनोद अण्णा दंडलवाड, शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि माता भगिनी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरील देशभक्तीपर गीतावर नृत्य सादरीकरण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यासोबतच या नृत्यासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या शिक्षीका साक्षी पोलावार आणि शिवमाला पेड मॅडम यांचे शाळेचे संचालक महेश वंटेकर सर, संस्थेचे सचिव दत्तात्रय मरेवाड, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष ॲडव्होकेट आशीषजी कुलकर्णी, सचिव मार्तंडराव नाईक, उपाध्यक्ष तिरुपती वडजे , सदस्य ज्ञानेश्वर वडजे, दिगांबर मरकटवाड, चंद्रकांत बेळीकर, संदीप इंगोले मुख्याध्यापिका सोनम वंटेकर मॅडम यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button