रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष शेख रफिक सेठ यांच्याकडून ईदगाहचे सर्वेक्षण

हिमायतनगर प्रतिनिधी:- २७ फेब्रुवारी २६ अजीम हिंदुस्तानी
आगामी रमजान ईदच्या तयारीसाठी हिमायतनगरमध्ये प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज, २७ फेब्रुवारी रोजी हिमायतनगरचे नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी शेख रफिक सेठ यांनी स्थानिक ईदगाहला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी ईदगाहच्या परिसराची स्वच्छता आणि इतर सुविधांचा आढावा घेण्यात आला. ईदच्या निमित्ताने ईदगाहला नवीन रंगरंगोटी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगराध्यक्षांनी यावेळी घेतला, जेणेकरून सणाच्या दिवशी हा परिसर प्रसन्न आणि सुसज्ज दिसेल.
या प्रसंगी नगराध्यक्ष शेख रफिक सेठ यांच्यासोबत विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने: मुजीब खान (अध्यक्ष, जामा मस्जिद मरकझ कमिटी हिमायतनगर),अब्दुल अखिल (माजीशहराध्यक्ष),अन्वर खान (अध्यक्ष, तंटा मुक्ती समिती),अशरफ खान, शेख इलियास (शहरसेवक),अब्दुल कलीम, समद खान, झीशान मिर्झा,जाविद खतीब, शेख निसार, शेख सलीम शेवाळकर, हनीफ सर व आदी यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकही उपस्थित होते. ईदगाहच्या नूतनीकरणामुळे मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सणाची तयारी उत्साहात सुरू आहे.



