मुखेड मानवता विचार मंचाची नवीन कार्यकारिणी जाहीर

▫️अध्यक्षपदी सदाशिव पाटील जाधव तर सचिवपदी पवनशेठ पोद्दार यांची बिनविरोध निवड
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ११ मार्च २६
शहरात सामाजिक कार्याला बळ देण्याच्या उद्देशाने मानवता विचार मंचाची महत्त्वपूर्ण बैठक सं. स. मस्कले सर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीत मानवता विचारमंचाच्या नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीत मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पाटील जाधव यांची मानवता विचार मंचाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थित सदस्यांनी स्वागतकरत पुढील काळात सामाजिक, व जनहिताच्या उपक्रमांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

तसेच कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी संजय सावकार मुक्कावार, सचिवपदी पवनशेठ पोद्दार तर कोषाध्यक्षपदी एस. आर. करखेलवार यांची निवड करण्यात आली.
याशिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून किसन पाटील, बालाजी मामा लिंगनवाड, विलास चौहान, सुधाकर जाधव, सं. स. मस्कले, बालाजी मामा पांपटवार, विठ्ठलराव इंगळे सर, संभाजीराव आचेवाड, मक्काजी दिनकर यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला मानवता विचार मंचाचे सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान समाजातील गरजू, निराधारव वृद्ध नागरिकांसाठी कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विशेषतः वृद्धाश्रमाची उभारणी व सामाजिक चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प सर्व सदस्यांनी केला.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबवून मानवतेची भावना जपण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.




