सामाजिक

३८ वर्षांचा वनवास संपता संपेना, शासनाकडून घोषणांचा  पाऊस; लेंडी धरणग्रस्तासाठी मात्र दुष्काळ ! – जैनोदीन पटेल


मुखेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ ११ मार्च २६: –

महाराष्ट्र व तेलंगाना सुयक्त विद्यमाने ३८ वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यात हारीत क्रांती घडावी या अनुशंगाने हरित क्रांतीचे जनक कै. शंकररावजी चव्हाण यांच्या हस्ते लेंडी धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. संबंधीत अधिकारी व राजकीय हेवेदाव्यांमुळे अद्यापही बुडीत क्षेत्रातील विस्तापित इतर सुविधा मावेजा पासून उपेक्षित राहुन स्वप्नांचा चक्काचूर होणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
दरम्यान लेंडी धरणास प्रारंभ १९८६ साली झाले. त्या वेळेस धरण पूर्ण करण्यासाठी 55 कोटी पुरेसे होते परंतू आज तब्बल बाविशे कोटी च्या वर धरण पूर्णत्वास होण्यास लागत आहेत तरीही आजही १२ गावातील धरणग्रस्त पूर्णवसन, नागरी सुविधा, सानुग्रह आनुदान, वाढीव कुंटूब धरण पुर्ण झाल्यावर ज्या मिळणारी नागरी सुविधा या प्रतिक्षेत रोज घटीका मोजीत आपले जिवन जगत आहेत. संबंधीत आधिकारी यांचा दुटप्पी धोरण व धरणग्रस्तांचा विश्वाघात करीत दबाव तत्रांचा वापर करीत गत वर्षी मे २०२५ रोजी लेंडी धरणाची गळभरणी करण्यात आली व गळभरणी करते वेळेसच काळ रात्र उजडली रात्री दिड वाजताच्या सुमारास धरणात पाण्याची पातळी वाढली व होत ते नव्हत झाल. यात पाच धरणग्रस्तांचे जिव गेले तर शेकडो जनावरे पाण्यात वाहुन गेले व रावणगांव, हासनाळ भुईसपाट झाले, कसे बसे धरणग्रस्त उंच ठिकानी वास्तव्यास राहिले व शासनाच्या बचाव कार्य दुसऱ्या दिवशी पाण्यातून बाहेर काढले ते आज शासन तयार करून दिलेल्या पत्राच्या शेड मध्ये जिवनाचे घटीका मोजत जगत आहेत. शासन पत्राच्या शेड मध्ये ठेवले त्यांच्या हाताला रोजगार नाही, काय खात आसतील यांचा विचार शासन करायला तयार नाही. पुर परिस्थती निर्माण होऊन जिवित हानि व वित्त हानी झाली त्यावेळेस पहानी करण्यास सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते कार्यक्रते रोज भेटी दिले. बैठका झाल्या परंतू धरणग्रस्ताच्या हातात अतापर्यंत आश्वासनाचा भ्रमाचा भोपळा दिसून आले. रावणगांव येथील सामाजिक कार्यक्रते जैनोदीन पटेल यानी रावणगांव येथून मंत्रालया पर्यंत पायी चालत ६५० किमीचे अंतर कापत मंत्रालय पर्यंत जाऊन संबंधित विभागाच्या सचिवाशिं चर्चा करून सविस्तर माहिती देऊन निवेदन देण्यात आले. तसे पत्र संबधीतास देण्यात आले.१२ गावातील लेंडी धरणग्रस्त या आशेवर आपल जिवन जगत आहेत आपल्या मागण्या पूर्ण होतील परंतू या  आर्थसंकल्पात सुद्धा लेंडी धरणासाठी कोणत्याही बॅजटची घोषणा शासना मार्फत करण्यात आली नसल्या मुळे धरणातून बेघर झालेल्य धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आजघडीला पाणे पुसण्याचे काम शासना कडून करण्यात आले तीच भावना घेऊन धरणग्रस्तांचे वनवास ३८ वर्षापासून संपता संपेना म्हण्याची वेळ धरणग्रस्तावर आली आशी प्रतिक्रिया लेंडी धरणग्रस्त जैनोदीन पटेल यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button