सामाजिक
चिमुकली फातेमा धुंदीचा पहिलाच रोजा; कुटुंबात अभिमानाचा क्षण

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० मार्च २६
रमजान महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर अवघ्या ६ वर्षांच्या फातेमा मुजीब धुंदी हिने आपल्याआयुष्यातील पहिला रोजा पूर्ण करत एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. लहान वयातच तिनेदाखवलेली श्रद्धा आणि संयम सर्वांसाठी कौतुकास्पद ठरत आहे.
फातेमा ही भाजपचे युवा नेते खाजा धुंदी यांची पुतणी असून, तिच्या या पहिल्या रोज्याबद्दल कुटुंबातआनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईक व परिसरातील नागरिकांकडूनतिचे कौतुक करण्यात येत आहे.
रमजान महिन्यातील रोजा हा केवळ उपवास नसून संयम, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा आहे. फातेमाने इतक्या लहान वयात हा अनुभव घेतल्याने तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजोबा करीमसाब धुंदी व वडील मुजीब धुंदी सर्वजण शुभेच्छा देत आहेत.



