सामाजिक

लातूर रोड-मुखेड-बोधन रेल्वे मार्गासाठी रेल्वे संघर्ष समिती आक्रमक; आमदार तुषार राठोड यांना दिले निवेदन

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १९ मार्च २६ 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर रोड – मुखेड – बिलोली – बोधन या १३४ कि.मी.च्यारेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रेल्वे संघर्ष समितीने आता कंबर कसली आहेया संदर्भात आज दि १९ मार्च रोजी समितीच्या शिष्टमंडळाने मुखेडकंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.तुषार गोविंदराव राठोडयांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

रामगुंडम ते कुर्डूवाडी या निजामकालीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले असूनबोधन पर्यंत पूर्वेकडे  लातूर रोड पर्यंत पश्चिमेकडे विकास झाला आहेमात्रत्यामधील मुखेडमार्गे जाणारा १३४ कि.मी.चा ‘मिसिंगलिंकचा टप्पा अद्याप अपूर्ण आहेया प्रकल्पाचे FSR (Feasibility Survey Report) आणिDPR (Detailed Project Report) पूर्ण झाले असूनतो सध्या राज्य शासनाच्या मान्यतेसाठीप्रलंबित आहेकेंद्र सरकारकडून निधी मिळवण्यासाठी राज्य शासनाने ५० टक्के आर्थिक वाटाउचलण्याची हमी देणे आवश्यक आहे.

निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार तुषार राठोड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाते म्हणाले कीहा रेल्वेमार्ग मुखेड आणि परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहेमी स्वतः या विषयासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेईनतसेचरेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची भेटही मुख्यमंत्र्यांशी घडवून आणूनराज्य शासनाकडून आवश्यक ते हमीपत्र मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नकरेन.”

हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास या भागातील मालवाहतूकव्यापारवृद्धी आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतीलमाननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुखेड येथील जाहीर सभेत या मार्गाबाबत आश्वासन दिले असल्याने जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे  अध्यक्ष दिलीप कोडगिरे ,कार्याध्यक्ष डॉव्यंकट माणिकराव भोसले , सचिव संपादक ज्ञानेश्वर डोईजड, मार्गदर्शक मल्लिकार्जुन एकाळे, बालाजी बंडेविठ्ठलराव इंगळे,सल्लागार पत्रकार अविनाश देशमुख ,अॅडविजय कोत्तापल्ले  ,उपाध्यक्ष दत्तात्रय चौधरी, संपादक आसद बल्खी , सहसचिव सचिन देबडवार, सुधाकर जाधव , कोषाध्यक्ष अण्णासाहेब जाहीर ,सदस्य संजय यलमवाड ,जांभळीकर सुभाष ,मूकावार संजय ,शेख शादुल,गोविंद वाडेकर आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेहा प्रश्न मार्गी लागल्यास मुखेडसह संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाहिरे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप कोटगिरे व डॉ. व्यंकट माणिकराव भोसले यांनी मांडले, ज्यामध्ये त्यांनी रेल्वे मार्गाची गरज आणि सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. शेवटी उपस्थितांचे आभार डोईजड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button