सामाजिक

कंधारजवळ धावत्या कारला भीषण आग; हरणाला वाचवताना घडला थरार

कंधार (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १३ एप्रिल २६

कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द गावाजवळ आज सोमवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडलीनायरा पेट्रोल पंपाजवळून जात असलेल्या एका ह्युंदाई कारला अचानक भीषण आग लागलीचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असलीतरी कारचा मात्र कोळसा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसारसंबंधित ह्युंदाई कार रस्त्यावरून जात असताना अचानक एक हरीण गाडीसमोर आलेहरणाला वाचवण्यासाठी चालकाने तातडीने आणि जोरात ब्रेक लावलेमात्रवेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली.

कार थांबल्यानंतर काही क्षणांतच इंजिनमधून धूर निघू लागलापरिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक तात्काळ गाडीतून बाहेर पडलात्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या गोळ्यात रूपांतरित झालीभररस्त्यात लागलेल्या या आगीमुळे परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्राथमिक अंदाजानुसारअचानक लावलेले ब्रेक आणि त्यानंतर झालेली धडक किंवा इंजिनमधील तांत्रिक बिघाड यामुळे ही आग लागली असावीअशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button