मुखेडमध्ये वैचारिक जागर: ज्येष्ठ विचारवंत शिवश्री गंगाधर बनबरे यांचे आज व्याख्यान

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १२ एप्रिल २६
क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मुखेडशहरात वैचारिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विचारवंत शिवश्री गंगाधर बनबरे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
आज १२ एप्रिल (रविवार) वेळ: सायंकाळी ७:०० वाजता स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुखेड फुले–आंबेकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवता विचारमंचाचे प्रमुख बालाजी लिंगनवाड हे असतील. कार्यक्रमाचे उद्घाटन इंजि. राजेंद्र वाघमारे आणि प्रा. उत्तमकुमार कांबळे यांच्या हस्ते पार पडणार आहे.
याप्रसंगी नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, शेकापचे अॅड. गोविंद पा. डुमणे, प्रभाकर पाटील तांदळीकर,उपसरपंच गणेश पाटील बेळीकर, शेतकरी नेते शिवशंकर पा. कलंबरकर, हणमंत पा. इंगोले, प्रताप पा. चौधरी, कॉ. शंकर बादावाड, पवन कांबळे येवतीकर, उमेश पाटील आडलुरकर, पंडित ढवळे, योगेश मामीलवाड, भाई असद बल्की, कुलदीप कोत्तापल्ले यांसह विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
महामानवांच्या विचारांवर आधारित प्रबोधनात्मक समाज निर्मितीसाठी मुखेडमध्ये दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. ज्येष्ठ नेते दशरथराव लोहबंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून, यावर्षी देखील शहरात वैचारिक प्रबोधनाचा जागर पाहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमास मुखेडमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे निमंत्रक अनिल बनसोडे व आशुतोष कांबळे यांनी केले आहे.
“समाजात जनजागृती व्हावी आणि महामानवांचे विचार घराघरात पोहोचावे, हाच या आयोजना मागचा मुख्य उद्देश आहे.” — समिती अध्यक्ष सदाशिवराव पा. जाधव व संयोजक राहुल लोहबंदे .



