सामाजिक

नागरजांबच्या पूजा भुरेची बुलढाणा पोलीस दलात निवड हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत संघर्षातून मिळविला यश.

मुखेड / प्रतिनिधी.श्रमिक एकता न्यूज़ १५ एप्रिल २६

 तालुक्यातील नागरजांब येथील शेतकरी श्यामराव भुरे या अल्पभुधारक शेतक-याची कन्या पूजा भुरे यांनी नुकतच झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करीत अथक परिश्रमाच्या जोरावर हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत संघर्षातून यशाचा मार्ग शोधत बुलढाणा पोलिस दलात निवड झाली आहे.शेतक-याच्या कन्येने पोलिस होण्याचे बहुमान प्राप्त केल्यामुळे पुजाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नागरजांबचे शेतकरी श्यामराव भुरे यांचे शेतीव्यतिरिक्त दुसरे कोणतेही उत्पन्न नाही सर्व संसाराचा गाढा शेतीच्या उत्पनावरच अवलंबून आहे.आपल्या शेतीमध्ये झालेल्या उत्पन्नावरच त्यांनी संपूर्ण कुंटुबाचा उदरनिर्वाह चालवुन हलाखीच्या परिस्थितीतून जसे जमेल तसे लेकरांच्या शिक्षणासाठी मदत करुन लेकरांना घडवण्याचे मोठे कार्य पार पाडत आहेत.पुजा ही शिक्षणात हुशार असल्यामुळे हळूहळू अभ्यासाच्या जोरावर तो यशाच्या समीप पोहचत गेली आणी अखेर पोलीस होवुन सरकारी नौकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले.घरची परिस्थिती हलाखीची व आपले आई-वडील शेतकरी असल्याची तिला  जाणीव होती.त्यामुळे आई-वडीलांच्या कष्टाची व परिश्रमाची जाण ठेवत शिक्षण हेच आपल्या जीवनात आणी कुटुंबात खरी क्रांती घडवू शकते याची मनाशी गाठ बांधत यशाचे दिशेने शिक्षणामध्ये अभ्यासात सातत्य,जिद्द,चिकाटी व अथक परिश्रम घेत नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेत मेहनतीच्या जोरावर पोलिस होण्याचे ध्येय पूर्ण करीत बुलढाणा पोलीस दलात निवड झाली.पुजा पोलिस झाल्यामुळे भुरे परिवार व नातेवाइकांमध्ये आंनदाचे वातावरण पसरले आहे.पुजाची बुलढाणा पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सरपंच मंगलबाई आंनदराव होनराव,उपसरपंच जयवंतराव पाटील,सरपंच प्रतिनिधी माधव होनराव,तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर होनराव,पोलीस पाटील ओमकार गोंड,सेवानिवृत्त शिक्षक गणेशराव गोंड,अॅड संतोष होनराव सह नागरजांब  गावातील प्रतिष्ठित नागरिक व मित्रपरिवार,नातेवाईक यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पूजा भुरेचे प्राथमिक शिक्षण पाखंडेवाडी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण जळकोट येथे झाले तसेच उच्च माध्यमीकचे शिक्षण गुरुदत्त विद्यालयात पूर्ण केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button