सामाजिक

प्रशासनाच्या नाकाखाली अवैध उत्खनन सुरूच; महसूल विभागाचे मुरूम चोरणाऱ्यांना पाठबळ?

मुखेड (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १५ एप्रिल २६

उमरदरी (तामुखेडयेथील गट क्रमांक ५८/ मध्ये सुरू असलेल्याबेकायदेशीर मुरूम उपशाबाबतची बातमी प्रसिद्ध होऊनही आणि प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारकरूनहीभूमाफियांनी आपला धुमाकूळ थांबवलेला नाहीउलटअधिक जोमाने रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि हायवा टिपर्सच्या साहाय्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लुटला जात आहेप्रशासनाच्या या ‘थंडा‘ भूमिकेमुळे आता महसूल विभागाचेच या अवैध धंद्याला मूक संमती तर नाही नाअसा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई असद इब्राहिमसाब बल्खी यांनी  एप्रिल रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होतेया निवेदनात स्पष्टपणे अवैध उत्खनना चा उल्लेख असता नाहीअद्याप घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पोहोचलेली नाहीबातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा सतर्क होण्याऐवजी भूमाफियांना मोकळे रान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसारतक्रार झाल्या पासून हे उत्खनन थांबण्या ऐवजी त्याचे स्वरूप अधिक ‘चोरटे‘ झाले आहे ते  हायवा टिपर्सच्या माध्यमातून रातोरात मुरूम गायब केला जात आहेपर्यावरणाची मोठी हानी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाआरोप होत आहे.

 ‘जाया मोका‘ पंचनामा त्वरित होणे अपेक्षित असताना टाळाटाळ का केली जात आहे?

आता चेंडू महसूल प्रशासनाच्या कोर्टात आहे. मुखेडचे तहसीलदार याकडे गांभीर्याने बघून गुन्हे दाखल करणार की भूमाफियांना अभय देणार, याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button