मुखेड येथे टिपू सुल्तान यांची २७३ वी जयंती उत्साहात साजरी.

◆ ढोल ताशाच्या गजरात महापुरूषांच्या जयघोषाने शहर दुमदुमले.
मुखेड / प्रतिनिधी
भारताचे स्वातंत्र्य सेनानी, शहीद ए वतन, मिसाईलमॅन फतेह अली खान हजरत टीपू सुल्तान रहेमतुल्ला अल्लैह यांची २७३ वी जयंती दि.२९ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथामध्ये हज़रत टिपू सुलतान यांची प्रतिमा ठेवुन ढोल ताशाच्या गजरात महापुरूषांचे जयघोष देत शहारातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते जयंती उत्साहात व शांतेत पार पाडली.
जंयती कार्यक्रमाची सुरुवात शेर-ए-हिंद हजरत टिपु सुलतान व महापुरूषांच्या प्रतिमेस टिपु सुलतान जयंती मंडळाचे अध्यक्ष शब्बीर बल्खी, उपाध्यक्ष खदिर शेख,आब्दुल कलाम समाजसेवा समितीचे एस.के.बबल्लु,सोहेल सय्यद यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करुन करण्यात आली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गेडेवाड, माजी नगरसेवक नासेरखाँ पठाण,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, पि.के.गायकवाड हंगरगेकर, सय्यद एफ.एम.,शौकत होनवडजकर,पत्रकार अनिल कांबळे, खाजा धुंदी, शमशोद्दीन सय्यद,आब्दुल सय्यद,राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे तालुकाध्यक्ष असद बल्खी, मुबीन बल्खी,पत्रकार बबल्लु मुल्ला,पत्रकार मुजिब सय्यद सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी टिपू सुलतान जंयती महोत्सव समितीचे अध्यक्ष शब्बीर बल्खी,उपाध्यक्ष खदीर शेख,सचिव जिलानी शेख,आसद बल्खी,गौस पठाण,बाबा बल्खी,अब्दुल सय्यद इलियास कादरी सह जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व समाजातील प्रतिष्ठित नागरिक तसेच युवकांनी परिश्रम घेतले आहे.यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक किशोर बोधगीरे, पोउनी गजानन अन्सापुरे, पोउनी भारत जाधव,पोउनी श्री.गीरी, डिएसबी विभागाचे पांडुरंग पाळेकर, पोकाॅ गंगाधर चिंचोरे, पोकाॅ योगेश कोकने यांच्यासह पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकीत विविध पक्षाचे पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, जयंती मंडळाचे सर्व सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.


