सामाजिक

जळकोट-मुखेड-बिलोली-बोधन रेल्वेमार्गासाठी निधी मंजुरीची मागणी

लातूर | प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ १३ मे २६

लातूर रोडमुखेडबिलोली – बोधन या प्रस्तावित नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी निधी मंजूर करून प्रकल्पाला गती द्यावीअशी मागणी लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने आमदार अमित देशमुख यांच्याकडे करण्यात आलीसंघटनेचे अध्यक्ष आकाश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे कीलातूर रोड ते बोधन दरम्यानच्या १३६ कि.मीलांबीच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण (FLS) पूर्ण झाले असून माती  खडक परीक्षणाचे काम सध्याप्रगत टप्प्यात आहेया प्रकल्पासाठी अंदाजे  हजार ४३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हा रेल्वेमार्ग जळकोटमुखेडचाकूरकंधारनरसीनायगावबिलोली आणि देगलूर या महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणार असून मराठवाडा आणि तेलंगणा दरम्यान वाहतूक  संपर्क अधिक मजबूत होणार आहेदक्षिण मध्य रेल्वेने जळकोट परिसरात  ते ३० फूट खोलीपर्यंत मातीचे नमुने गोळा करून तेतपासणीसाठी हैदराबाद येथे पाठवले असल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे.

हा प्रकल्प नीति आयोगाच्या अखत्यारीतील महत्त्वाचा “मिसिंग लिंक” प्रकल्प मानला जात असून महाराष्ट्र  तेलंगणा सरकारकडून ५० टक्के खर्च वाटा मिळणे आवश्यक आहेमात्र याबाबत अद्यापस्पष्टता नसल्याने प्रकल्प रखडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या रेल्वेमार्गामुळे विशाखापट्टणम  कोकणातील जेएनपीटी बंदराशी थेट संपर्क निर्माण होणार असून रामागुंडम येथून कोळसा वाहतूक सुलभ होणार आहेतसेच परळीपंढरपूरतुळजापूरअक्कलकोट आणि कोल्हापूर या धार्मिक स्थळांशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण होऊन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button