क्राईम

लग्नात डीजेवर नाचल्याच्या रागातून पत्नीची हत्या, पतीचीही आत्महत्या; तीन चिमुकली पोरकी

हिमायतनगर प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १३ मे २६

नाती जोडली जातात ती विश्वासाने आणि प्रेमानेमात्र संशयाचं भूत डोक्यात शिरलं की होत्याचं नव्हतंहोतंयाचाच प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात आला आहेचुलत मेहुण्याच्या लग्नातपत्नी डीजेवर नाचलीया किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवनयात्रा संपवलीया धक्कादायक घटनेमुळे बोरगडी तांडा परिसरात खळबळ उडाली असून तीन लहान मुलांचे छत्र हरपले आहे.

नेमकी घटना काय? 

मिळालेल्या माहितीनुसारमयत पायल विनोद राठोड (२७आणि विनोद रंगराव राठोड (४०हे दाम्पत्य भोकर तालुक्यातील फुलवाडी तांडा येथील रहिवासी होतेहिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथेचुलत भावाच्या लग्नासाठी ते आले होते१० मे रोजी लग्नामध्ये पायल यांनी डीजेवर नृत्य केलेजे पती विनोदला आवडले नाहीयाच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

लग्नानंतर पायल मुलांसह माहेरीच राहिल्या होत्यामात्र विनोदचा राग शांत झाला नव्हतामंगळवारी पहाटे  वाजेच्या सुमारास संधी साधून विनोदने धारदार चाकूने पायल यांचा गळा चिरून त्यांची हत्या केलीपत्नीचा खून केल्यानंतर त्याने गावाच्या शिवारात जाऊन एका झाडाला गळफास घेत आपलीही जीवनयात्रा संपवलीसकाळी कुटुंबीय उठल्यानंतर हा रक्तरंजित प्रकार उघडकीस आला.

या घटनेत राठोड दाम्पत्याच्या दोन मुली आणि अवघ्या  महिन्यांच्या चिमुकल्या मुलाने आईवडील दोघांनाही गमावले आहेघटनास्थळी आपल्या आईवडिलांच्या मृत्यूचा आक्रोश करणाऱ्या याचिमुकल्यांना पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होतेहिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी धावघेत पंचनामा केला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

एका लग्नाच्या आनंदाचे रूपांतर काही तासांतच दुःखात झालेसंतापाच्या भरात पतीने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे एका हसत्या खेळत्या संसाराचा अंत झाला असूनसमाजातील वाढत्या असहिष्णुतेवर या घटनेने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button