सामाजिक

पवन जगडमवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालगृहातील चिमुकल्यांना मिळाली शिवविचारांची शिदोरी!

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १६ मे २६

सध्याच्या काळात वाढदिवसावर लाखो रुपयांची उधळपट्टी करून फ्लेक्सबाजी आणि डीजेचा बडेजावकरण्याचे फॅशन झाले असतानानांदेडमध्ये मात्र एका आगळ्यावेगळ्या आणि स्तुत्य उपक्रमाने देशोन्नतीचे उपसंपादक कॉम्रेड पवन जगडमवार यांनी वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकीचानवा आदर्श घालून देण्यात आला आहेनांदेड शहरातील ‘सुमन मुलींचे बालगृह‘ येथील अनाथ आणि निरागस लहान बहिणीं सोबत केक कापून आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

जगडमवार म्हणाले बालगृहातील चिमुकल्या बहिणींच्या हस्ते केक कापताना मिळणारा आनंद आणि त्यांच्या निरागस चेहऱ्यांवरील हास्य हीच माझ्या वाढदिवसाची खरी आणि अनमोल भेट आहेअशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आलीकेवळ केक कापून  थांबता वाढदिवसाचे औचित्य साधून बालगृहातील सर्व लहान बहिणींना पोटभर भोजन देण्यात आलेतसेच त्यांच्या भावी आयुष्याला योग्यदिशा मिळावी आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण व्हावीया उद्देशाने ‘शिवाजी कोण होता’ हे विचारप्रवर्तक पुस्तक भेट म्हणून देण्यात आलेछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या बहिणींच्याआयुष्यात नक्कीच नवी प्रेरणा देतीलअशी सदिच्छा यावेळी व्यक्त केली गेली.

या कौतुकास्पद आणि संवेदनशील उपक्रमाच्या वेळी ‘सुमन मुलींच्या बालगृहाचे‘ संचालक अनिलदिनकरएआयएसएफ (AISF) चे राज्यउपाध्यक्ष कॉम्रेड प्रसाद गोरेकॉभारत पवारकॉप्रेम धोंगडेकॉआकाश राठोडएनएसयूआय (NSUI) चे प्रदेश महासचिव किरण पडलवारएसएफआय (SFI) याविद्यार्थी संघटनेचे कॉसुनील तलवारेकॉमाधव कुदळे आदींसह विविध क्षेत्रांतील तरुण आणिकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजातील उपेक्षित घटकांना सोबत घेऊन साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाचे आणि याअनोख्या उपक्रमाचे सध्या नांदेड शहर  सोशल मीडियावरून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button