राजकीय

 संतोषदादा बांगर यांना मंत्रिपद मिळणे ही काळाची गरज; शहरप्रमुख बजरंग कल्याणे यांची डरकाळी!

मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ १६ मे २६

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून सातत्याने संघर्ष करणारेगोरगरिबांचे कैवारी आणि शिवसैनिकांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहणारे आमदार संतोषदादा बांगर यांना मंत्रिपद मिळणे ही आज काळाची गरज आहेअशी जाहीर आणि आग्रही मागणी मुखेड नगर परिषदेचे शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक बजरंग भाऊ कल्याणे यांनी केली आहेसंतोषदादा बांगर यांच्या रूपाने एका खऱ्या जनसामान्यांच्या नेत्याला मोठी जबाबदारी मिळावीअशी तीव्र भावना आता संपूर्ण जिल्ह्यातून आणि कार्यकर्त्यांमधून उमटू लागली आहे.

बजरंग भाऊ कल्याणे यांनी संतोषदादा बांगर यांच्या कार्यशैलीचा गौरव करताना सांगितले कीदादांचे नेतृत्वत्यांची धडाडीची कार्यशैली आणि जनसामान्यांशी असलेले त्यांचे घट्ट नाते हे केवळ मराठवाड्यासाठीच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहेसंकट काळात धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ख्याती असूनसर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांनी नेहमीच रोखठोक भूमिका घेतली आहे.

शिवसेनेचा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता आज संतोषदादा बांगर यांना अधिक मोठ्या जबाबदारीत आणि मंत्रिपदावर पाहू इच्छितोदादांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास जनतेच्या प्रश्नांना अधिक गतीने न्याय मिळेल आणि विकासकामांना मोठी गती येईलअसा विश्वास बजरंग भाऊ कल्याणे यांनी व्यक्त केलाआहे.

संतोषदादा बांगर यांच्या मंत्रिपदाच्या या मागणीला आता शिवसैनिकांकडून मोठा पाठिंबा मिळत असूनसोशल मीडियावरूनही “आता दादांना मंत्रिपद मिळावेच” अशा पोस्ट कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button