जिद्द आणि चिकाटीचे फळ: सरफराज शेख यांना ‘श्रम-साफल्य पुरस्कार’ प्रदान

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ११ जून २६
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचे शिखर गाठणाऱ्या युवकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून, नागपूर कारागृह पोलीस आणि SRPF पुणे अशा दोन्ही परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मुखेडचे सुपुत्र सरफराज मुजीब शेख यांचा ‘श्रम-साफल्य पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
सरफराज शेख यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर एकाच वेळी दोन महत्त्वपूर्ण परीक्षांत यश मिळवले. त्यांची निवड अखेर SRPF पुणे येथे झाली आहे. त्यांच्या या यशाने मुखेड शहराच्या शिरपेचात मानाचातुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां समोर त्यांनी एक नवा आदर्श ठेवला आहे.
मान्यवरांची उपस्थिती या सत्कार समारंभाला परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सरफराज यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
या वेळी राहुल लोहबंदे (युवा उद्योजक) ,रियाज शेख (संचालक, IQRA पब्लिक इंग्लिश स्कुल) भाई असद बल्खी (संपादक) ,मुक्तरसेठ बेळीकर व मगदुम सेठ बेळीकर,ईलियास कादरी, बबलु भाई धुंदी व अनिल बनसोडे,अशितोष कांबळे, बंटीभाऊ होनवडजकर, रितेश कांबळे आणि पपन वाघमारे उपस्थित होते
या पुरस्कारामुळे सरफराज शेख यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात पोलीस दलात सेवा बजावताना ते आपली कर्तव्यनिष्ठा अशीच जोपासतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रामाणिक कष्ट आणि जिद्द असेल तर यश नक्कीच मिळते, हेसरफराजने सिद्ध करून दाखवले आहे.” — राहुल लोहबंदे



