क्राईम

मुंबई ते नरसी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! बिलोली DYSP पथकाचा ‘राज बार’वर छापा; ६ महिलांची सुटका, ४ जणांवर गुन्हा दाखल

नायगाव/नरसी (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०६ एप्रिल २०२६)

अनैतिक मानवी व्यापार आणि देहविक्रीच्या काळ्या व्यवसायाला चपराक देण्यासाठी बिलोली विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांच्या (DYSP) विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहेनायगाव तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘राज बार अँड हॉटेल’ वर टाकलेल्या छाप्यात चक्क मुंबईहून महिलांना आणून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेआहेयाप्रकरणी पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अनैतिक मानवी व्यापारावर आळा घालण्यासाठी बिलोली DYSP च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे नरसी येथील राज बार हॉटेलवर धाड टाकलीया कारवाईत मुंबईहून महिलांना नरसी मध्ये पुरवणारा मुख्य सूत्रधार सोहेल शेख याच्यासह अन्य एका आरोपीला अटक करण्यात आली आहेपोलिसांनी घटनास्थळा वरून ६ पीडित महिलांची सुटका केली असूनत्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुनर्वसनासाठी सुधार संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

पोलिसांनी या छाप्यात वेश्या व्यवसायातून मिळवलेला एकूण  लाख  हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेयामध्ये  ४६ हजार ५०० रुपये ,मोबाईल फोन व सुमारे  लाख रुपये किमतीची गाडी पोलिसांनी हस्तगत केला आहे

आरोपी सोहेल शेख हा मुंबईवरून महिलांना वेश्याव्यवसायासाठी नरसी येथे पुरवत असल्याचे तपासात उघड झाले आहेया घटनेमुळे नायगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असूनया रॅकेटमध्ये हॉटेल मालकासह आणखी कोणाचे हात आहेतयाचा सखोल तपास रामतीर्थ पोलीस आणि बिलोली DYSP पथक करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button