निर्भिड पत्रकार संदीप कामशेट्टे यांचा वाढदिवस साजरा ; मुखेड तालुका मराठी पत्रकारसंघाच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे संघटक संदीप कामशेट्टे यांच्या जन्मदिना निमित्त संघटनेच्या वतीनेशाल,पुष्पगुच व पेढे देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. कामशेट्टे पुण्यनगरीचे पत्रकार असून गेली अनेक वर्षे प्रभावी,निर्भिड पत्रकारिता करत आहेत. आज रविवार दिनांक ११ मे रोजी मुखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे जन्मदिन साजरा करण्यात आला.

जेष्ट पत्रकार यशवंत बोडके यांनी प्रास्ताविकातून पत्रकार संदीप कामशेट्टे यांच्या कार्याचा गौरव केला.
ते म्हणाले संदीप कामशेट्टे हे अतिशय संतुलित,निर्भिड पत्रकार आहेत. केवळ पत्रकारिता क्षेत्रातीलच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटका सोबत मिळून मिसळून व आपुलकीने वागणारे हे व्यक्तिमत्व प्रत्येकालाच हवेहवेसे वाटते.

तर संघटनेचे अध्यक्ष पत्रकार महेताब शेख व रामदास पाटील,आसद बल्खी यांनी संदीप कामशेट्टे यांचीलेखणी उत्तरोत्तर प्रगल्भ होत राहो, व तिला यशाची सोनेरी किनार जडत जावो असे आशिर्वाद दिले

तर पत्रकार बिरादार,पत्रकार श्रीमंगले,छायाकार आंबेकर,ठाकूर यांनी संदीप कामशेट्टे यांची अशीच उत्तरोत्तर भरभराट होत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली
संदीप कामशेट्टे यांनी असेच पत्रकार बांधवांचे प्रेम सदैव मिळत राहो असे म्हणत सर्वांचे आभार मानले.

जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जेष्ट पत्रकार यशवंत बोडके सर,मराठी पत्रकार संघाचे मुखेड तालुकाद्यक्ष पत्रकार महेताब शेख,पत्रकार रामदास पाटील,संपादक आसद बल्खी पत्रकार बिरादार,पत्रकार श्रीमंगले,छायाकार आंबेकर,ठाकूर आदीमान्यवर उपस्थित होते.



