क्राईम

फी’साठी मुजोर संस्थाचालकानं केलेल्या मारहाणीत पालकाचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं परभणी हादरलं 

परभणी:- १२ जुलै २५

आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेलेल्या पालकाला फीससाठी चक्क संस्थाचालकाने एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

राज्यात आजही अनेक शैक्षणिक संस्थाचालकांकडून पालकांचा छळ सुरु असल्याचे प्रकार घडत आहेतविद्यार्थ्यांची टीसी मागितली तर उर्वरीत फी भरेपर्यंत टीसी दिली जात नाहीत्यात मग दादागिरी केलीजाते ,मारहाण होतेअसाच प्रकार परभणीत घडला आहेएक वारकरी संप्रदायाचा पालक आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेले यावेळी उर्वरित फीससाठी चक्क संस्थाचालकाने पालकाला एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय

फी साठी संस्थाचालकाची मुजोरी थेट पालकाच्या जीवावर उठली आहेसंस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत पालकाचा जीव गेला आहेयाप्रकरणी संस्था चालकावर परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर व्रत असे की परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेशअवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरीत केला होतामात्र तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला इथे नको म्हणत गावातील शाळेतच टाका असा तगादा तीन वर्षीय मुलीने पालकांकडे लावला होतात्यावरून तिचे वडीलजगन्नाथ हेंडगे हे आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी हायटेक शाळेत गेले असता तिथेच त्यांचा घातझालासंस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांना हेंडगे यांनी प्रवेश घेताना दिलेले पैसे मागितलेयावेळी चव्हाण यांनीही हेंडगे यांना तुम्हीच उर्वरित फी द्या अशी मागणी केली .यातूनच वाद झाला अन्संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने जगन्नाथ हेंडगे यांना बेदम मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button