मिसाईल मॅन ऑफ इंडिया’, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

मुखेड प्रतिनिधी:-
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिन दि १५ ऑक्टोंबर रोजी ०६ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुखेड येथे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉ. एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समिती या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी गौस पठाण, मुनवर शेख, पत्रकार आसद बल्खी, पत्रकार मो.रफिक, फेरोज सय्यद, खदिर शेख, इरफान शेख, मदार दफेदार, मोसिन शेख आदी या सामजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना जीवन आणि लोकांबद्दलच्या त्यांच्या नम्र दृष्टिकोनामुळे “लोकांचे राष्ट्रपती” म्हणून ओळखले जात असे. ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे राष्ट्रपती म्हणून काम केले आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मध्ये ४० हून अधिक काळ काम केलेले प्रख्यात शास्त्रज्ञ होते
डॉ. कलाम हे ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’, ‘प्रेसिडेंट ऑफ द पीपल ऑफ इंडिया’ अशा अनेक नावांनी देशात आणि जगात ओळखले जातात. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल, त्यांना 30 विद्यापीठे आणि संस्थांकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ आज देशात विद्यार्थी दिन म्हणून पण साजरा केला जातो.
त्यांनी त्यांच्या हयातीत अनेक पुस्तके लिहिली, त्यापैकी ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘माय जर्नी’, ‘इग्निटेड माइंड्स’ ही प्रमुख पुस्तके आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतरे झाली
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 1998 मध्ये यशस्वी ‘पोखरण II अणुचाचणी’मध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यासाठी त्यांना ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून गौरवण्यात आले यानंतर, नोव्हेंबर 1999 ते नोव्हेंबर 2001 पर्यंत ते भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते. या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते.
डॉ. कलाम यांना जगाने शिक्षक म्हणून स्मरण करावे अशी त्यांची इच्छा होती. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आणि नवीन कल्पना ऐकण्यात त्यांना आनंद वाटायचा. ‘स्वप्न पाहण्यासाठी तुम्हाला एक स्वप्न असणे आवश्यक आहे’ या त्यांच्या प्रसिद्ध वाक्यानं तरुण पिढीला त्यांची आवड जोपासण्यासाठी प्रेरित केले. त्यांची मते आणि भावना मोठ्या प्रमाणावर मांडल्या जातात. कलाम यांची तत्त्वे आणि विचारांशी असलेली बांधिलकी अनेकांना प्रेरक आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून ओळखणे योग्य आहे.


