सामाजिक

आजचे एक झाड, उद्याची हिरवीगार भेट”; सावली फाउंडेशनचा बेटमोगऱ्यात वृक्षलागवडीचा धडाका

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :- १३ ऑगस्ट २६

पर्यावरण संवर्धना बरोबरच गावात निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने ‘सावली फाउंडेशन, बेटमोगरा‘ यांच्या वतीने यंदाही व्यापक वृक्षलागवड चळवळ हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत यावर्षी तब्बल ३०० झाडे लावण्याचा संकल्प फाउंडेशनने केला असून, या उपक्रमाला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या काही वर्षांपासून सावली फाउंडेशनच्या माध्यमातून बेटमोगरा परिसरात वृक्षलागवड, वृक्षसंवर्धनआणि पर्यावरण जनजागृतीचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. मागील दोन वर्षांत फाउंडेशनने ६०० हून अधिक झाडांची लागवड केली असून, त्यांचे योग्य संगोपन केल्याने आज ती झाडे चांगल्या स्थितीत बहरली आहेत. याच कार्याचा वसा पुढे नेत यंदा ३०० नवीन झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, या मोहिमेला उत्साहात सुरुवात झाली आहे.

या वृक्षलागवड मोहिमेचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ झाडे लावून न थांबता, लावलेल्या रोपांचे दैनंदिन संगोपन व संवर्धन करण्यावर फाउंडेशनचा विशेष भर असतो. ‘सावली उद्याना‘सहगावातील विविध सार्वजनिक ठिकाणी ही वृक्षलागवड करण्यात येत आहे. या विधायक उपक्रमाला गावातील युवक, निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते यांचे मोठे पाठबळ मिळत आहे.

समाजातील विविध घटकांना पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीशी जोडण्यासाठी गावातील प्रतिष्ठितव्यक्ती आणि मान्यवरांना विशेष आमंत्रित करून त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण केले जात आहे. यामुळेगावात पर्यावरणा विषयी मोठी जनजागृती निर्माण होत आहे.

“आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली हिरवीगार भेट” या भावनेतून प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन सावली फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या ३०० वृक्षांच्या संकल्पातून बेटमोगरा परिसर अधिक हिरवागार करण्यासोबतच, निसर्गप्रेमी युवकांची एक भक्कम फळी उभी करण्याचा फाउंडेशनचा मानस आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button