Uncategorized

नांदेड बस स्थानकाला महाराणा प्रताप सिंह यांचे नाव देण्याची मागणी


नांदेड – जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील जनतेला महाराणा प्रताप सिंह यांच्या शोर्याची, त्यागाची माहिती आणि प्रेरणा मिळावी यासाठी नांदेड येथील मध्यवर्ती बस स्थानकास महाराणा प्रताप सिंह यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे गाडीपुरा-सराफा मंडळाध्यक्ष आशिषसिंह ठाकुर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराणा उदय सिंह यांच्या मृत्यूनंतर इ.स.१५४० मध्ये मेवाडचे राजे म्हणून महाराणा प्रताप सिंह गादीवर विराजमान झाले आणि त्यांनी अकबर,खिलजी, पठाण या मुघल राजांशी युद्ध करून आपल्या राज्यातील जनतेला मुघलांपासून होणाऱ्या जाचक त्रासातून, अन्याय-अत्याचारापासून मुक्त केले, त्यांना संरक्षण मिळवून दिले. महाराणा प्रताप सिंह यांच्या या शौर्याची आणि त्यागाची नांदेड येथील बस स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माहिती व्हावी, नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून नांदेड येथील मध्यवर्ती एसटी बस स्थानकास महाराणा प्रताप सिंह यांचे नाव द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे गाडीपुरा-सराफा मंडळाध्यक्ष आशिषसिंह ठाकुर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन आणि नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दिल्या आहेत. यावेळी लव राठौर, बंटी परमार, रोहित कौशिक, शैलेश शर्मा, अक्षय राठौर, भारत ठाकुर, विक्रम ठाकुर, गजानन सिंह चंदेल, सागर परमार, साई गहलोत, मयूर निधानकर आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button