सामाजिक

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मुखेड न्यायालयासमोर अभिवक्त्यांचे धरणे आंदोलन!

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- दि. २५ जुलै


NEET-2026 परीक्षा पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज अभिवक्ता संघ, मुखेड यांच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, मुखेड तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी अभिवक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. तसेच, लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनानंतर मा. भारताच्या राष्ट्रपती महोदया यांना उद्देशून मा. तहसीलदार, मुखेड यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, NEET-2026 पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली.
अभिवक्ता संघ,मुखेड यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. न्याय, पारदर्शकता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी अभिवक्ता संघ विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कायम ठामपणे उभा राहील.

यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ दिगंबरराव मावलीकर, ॲड.एस.जे.गायकवाड,ॲड.शिवराज पाटील कुंद्राळकर, ॲड.नामदेव हाके,ॲड.गजानन शिंदे,ॲड. दत्ता हाके, ॲड.बी.जी. जाधव,ॲड.शिवाजी मुर्कीकर,ॲड.संजय भारदे,ॲड.राहुल मोरे,ॲड.शारदा जाधव,ॲड.भाग्यश्री कासले,ॲड.अरुणा वरठी,ॲड.शिवाजी मुर्कीकर, ॲड.एच.आर.शेख,ॲड.गजानन देवकत्ते, ॲड.माधव मरकंठवाड,ॲड.योगेश सोलनकर,ॲड.अंतेश्वर गोगे,ॲड.एम. सी. गवलवाड, ॲड.जाफर सय्यद, ॲड.असलम शेख, ॲड.वाय.जे.तांबोळी, ॲड. उस्मान तांबोळी,ॲड. टी. एन.वाघमारे,ॲड.शंकर बादावाड, ॲड.आनंद जोगदंड आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button