राजकीय

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी!

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : २१ जुलै २६

देशातील शिक्षण व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि ‘नीट‘ (NEET) परीक्षेतील गंभीर अनियमितते विरोधात ज्येष्ठ समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या उपोषणाला मुखेड (जि. नांदेड) येथील सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आणि सुज्ञ नागरिकांनी जाहीर पाठिंबा दर्शवत तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यासंदर्भात मुखेडचे तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपतींना एक सविस्तर निवेदन पाठवण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या न्याय्यहक्कांसाठी आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शक सुधारणा करण्याच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसले आहेत. सलग २० दिवसांच्या अन्नत्यागामुळे त्यांचे वजन तब्बल९ किलोने घटले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आहे. देशभरातील नागरिक त्यांचा थकलेला देह पाहून हळहळ व्यक्त करत असताना, केंद्र सरकार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मुखेडकरांनी केला आहे.

बळजबरीने रुग्णालयात नेणे ही लोकशाहीची गळचेपी सकाळी प्रशासनाकडून सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलून रुग्णालयात नेण्यात आले. लोकशाही मार्गाने आणि शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या एका नि:स्वार्थ समाजसेवकाचा आवाज अशा प्रकारे बळजबरीने दाबण्याचा प्रयत्न करणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाहीची गळचेपी करणारे कृत्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे. केंद्रातील हेसरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि वांगचुक यांच्या जिवाशी खेळत असून, या असंवेदनशील कृतीचा निवेदनाद्वारे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

देशाच्या सर्वोच्च घटनात्मक प्रमुख या नात्याने राष्ट्रपतींनी याप्रकरणात तातडीने लक्ष घालावे आणि केंद्र सरकारला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी आग्रहाची मागणी मुखेड येथील नागरिकांनी केली आहे. सोनम वांगचुक यांच्या मागण्या तत्काळ मान्य करून देशातीललाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे रक्षण करावे, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

सरकारने या प्रामाणिक आंदोलनाची तातडीने दखल न घेतल्यास मुखेड शहरासह संपूर्ण देशभरात या सरकार विरोधात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा मुखेड तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि सुज्ञ नागरिकांनी यानिवेदनाद्वारे दिला आहे.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. श्रावण रॅपणवाड,राज्यमध्यवर्ती सदस्य शेकाप भाई आसद बल्खी ,स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर,राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषद जिल्हाध्यक्ष पत्रकार शेख मेहेताब,तन्जीम ए इन्साफ तालुकाध्यक्ष बबलु मुल्ला,काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,जिल्हा कार्याध्यक्ष शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिनेश पाटील केरूरकर,प्रहार,छावा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरूरकर,दिव्यांगआघाडी शहराध्यक्ष संजय कांबळे,रिपाई जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे,राष्ट्रवादी काँग्रेस जयभिम सोनकांबळे,भिमशक्ति तालुकाध्यक्ष आकाश कांबळे,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील हसनाळकर,काँग्रेस सेवादल विद्याधर अण्णा साखरे,जिल्हा युवक काँग्रेस सचिव सुनिल पाटील आरगिळे,राजमुद्रा संघटना अध्यक्ष सचिन पाटील,सामाजिक कार्यकर्ते जाकीरभाई बाऱ्हाळीकर,व्हाईसऑफ मिडियाचे रियाज शेख,वंचित बहुजन आघाडी सुभाष कांबळे,ग्राहक पंचायत संघटना जिल्हाउपाध्यक्ष अशोक बच्चेवार, पशुचिकित्सक राज्याध्यक्ष डॉ.राहुल कांबळे,शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय पाटील,पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष भारत सोनकांबळे बेटमोगरेकर,माजी शेकाप जिल्हाध्यक्ष गोवींदराव डुमणे,भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष कुलदीप बनसोडे,युवक काँग्रेसनेते तुकाराम सुडके,अल्पसंख्याक परिषद सदस्य दस्तगिर शेख,प्रभाकर कागदेवाड,गौस पठाण, संदीपसुडके, हमीद मनीयार,आनंदराव गायकवाड,जावेद शेख,ऑल इंडिया पंक्चर सेना राजेंद्र लष्करे,गंगाधर सोंडारे,हणमंत हाक्के* सह विविध राजकीय पक्षांचे,सामाजीक संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button