Uncategorized
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात जागतिक एड्स दिवस साजरा.

◆ जेष्ठ पत्रकार सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते भितीपत्रकाचे उदघाटन
मुखेड / प्रतिनिधी.
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिवस महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यादरम्यान भित्तीपत्रकावर प्रदर्शित माहितीचे उद्घाटन वंडगीर गावचे सरपंच तथा जेष्ठ पत्रकार सुनिल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.एड्स हा समाजाला लागलेला कलंक असुन काही निष्पाप लोक या रोगाला बळी पडत आहेत या संकटातून सावरण्यासाठीच हा दिवस साजरा केल्या जातो निरोगी व निरामय समाज निर्मितीसाठीचा हा प्रयत्न आहे असा विचार वीरभद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर श्रीकांत पाटील हंगरगेकर यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष श्रीकांत पाटील हंगरगेकर होते तर प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष सुभाषअप्पा शिवपुजे, सचिव रणजित पाटील हंगरगेकर, शंकरराव बसापुरे, ओंकारअप्पा मठपती, शिवराज पाटील हंगरगेकर, महेश पाटील हंगरगेकर, नांदेडचे दै.लोकमतचे सुनील कुलकर्णी, महावीर शिवपुजे,पांडुरंग चमकुरे, माजी सरपंच हणमंतराव पताळे,प्राचार्य डॉ.एस.बी.अडकिणे, प्रा.सी.बी.साखरे, उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.चंद्रकांत एकलारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.भारत केंद्रे यांनी मानले तसेच प्रतिज्ञा वाचन प्रा.डॉ.प्रसाद जोशी यांनी केले.भित्तीपत्रकावर प्रदर्शित माहितीचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.एडस जनजागृती निर्माण करण्याकरिता महाविद्यालयाच्या वतीने भव्य रँलीचे आयोजन करण्यात आले होते.एड्स मुळे समाजात निर्माण झालेल्या चुकीच्या गैरसमजुती, नवनवीन उपचार पद्धती विकसित झाले आहेत, समाज या आजाराने बाधित व्यक्तिला वाळीत टाकण्या ऐवजी सामोपचाराने सहकार्य करण्याची गरज आहे, सुरक्षित अंतर आणि आवश्यक साधन सामुग्रीचा वापर करण्यात यावा, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी ब्रम्हचर्य पालन करणे आवश्यक आहे असे विचार मान्यवरांकडून याप्रसंगी व्यक्त करण्यात आले, यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


