क्राईम

मुखेड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल

मुखेड : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यातगटविकास अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध मुखेडपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेही घटना शुक्रवार दि२५ रोजी सायंकाळी घडली.

मुखेड पंचायत समिती कार्यालय परिसरात बचत गटाचे कार्यालयात अभियान व्यवस्थापक नंदकिशोरवसंतराव मार्गे  संतोष दाजी सोनवणे हे आचारसंहिता भंग करत बचत गटाच्या महिलांना साड्यासन्मानपत्र लखपती योजना माहिती रजिस्टर इत्यादी साहित्य वाटप करत होतेहा प्रकार शुक्रवार दि.२५रोजी पंचायत समिती मुखेडच्या बचत गटाच्या कार्यालय आवारात सायंकाळी घडलादोघेजण मिळूनउपरोक्त साहित्य वाटप करत असल्याचे आढळून आलेयामुळे संबंधितांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचेस्पष्ट झालेगटविकास अधिकारी तथा आचारसंहिता पथक प्रमुख चंद्रशेखर रामोड यांनी दिलेल्याफिर्यादीवरून नंदकिशोर वसंतराव मार्गे  संतोष दाजी सोनवणे यांच्याविरुद्ध पोलिसांनी आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहेपोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button