Uncategorized

पवित्र रमजान महिन्यात भारनियमन करू नये:- एपिजे अब्दुल कलाम समाज सेवा समिती

मुखेड प्रतिनिधी:- आसद बल्खी

मुखेड :- ११ मार्च पासून इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजान सुरू होत आहे.
या महिन्यात मुस्लीम अनुयायी पवित्त कुरआन पठण, नमाज, विशेष तराविह नमाज, उपवास आदि माध्यमातून अल्लाहचे स्मरण (ईबादत) करतात या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर अन्नपाणी सेवन न करता उपवास ठेवतात. उन्हाळा सुरू असल्याने वाढलेल्या भयंकर तापमानामुळे उपवासात त्रास होईल. पहाटे ०३ वाजता स्वयंपाक करणे, पहाटे नमाज रात्री तरावीह नमाज व कुराण पठण करत असतात. त्‍यामुळे रमजान महिन्यात वीज भारनियमन करू नये,व रमजानच्या पूर्वीच वीजपुरवठा मेन्टेनेस ची पूर्ण कामे करावी अशी मागणी डॉ एपिजे अब्दुल कलाम समाज सेवा समिती मुखेड ने वीज महावितरण कंपनीच्‍या अभियंत्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना एस.के.बबलू ,पत्रकार महेताब शेख, मुनवर शेख,गौस पठाण, इब्राहिम शेख,रौफ मुला,इम्रान अत्तार,फिरोज सय्यद, रफिक शेख,आमजात शेख, असलम मुला अदि उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button