मुखेड – कंधार विधानसभेची काँग्रेस पक्षाची उमेदवारी बेटमोगरेकर यांना जाहीर

मुखेड प्रतिनिधी:-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाची महाविकासआघाडीत काँग्रेस ला जागा गेली यात माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना दि. २६ रोजीरात्री ११ च्या सुमारास उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी कडून अनेक जण रिंगणात होते. यात काँग्रेसकडून माजी आमदार हणमंतराव पाटीलबेटमोगरेकर, डॉ. त्र्यंबक दापकेकर यांची नावे शेवटच्या क्षणापर्यंत होती. यात बेटमोगरेकर यांनी शेवटच्याक्षणी बाजी मारत तिकीट आपल्या पारड्यात टाकण्यात त्यांना यश आले.
माजी जिप सदस्य संतोष राठोड यांनी सुध्दा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेनेला जागासोडण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे दिसून आले. मुखेड मतदारसंघात काँग्रेस कंधार भाजप अपक्ष अशीरंगत होण्याची चिन्हे आता दिसत आहेत. मतदारसंघातील अनेक प्रश्न जैसे थे वैसे असल्याने भाजपसाठी हीलढाई सोपी नसली तरी जातीय समीकरण पाहता व विकासाच्या प्रश्नावर राजकीय लढाई झाल्यास मतदारकोणाच्या बाजूने कौल देणार हे आत्ताच सांगणे कठीण होईल असे दिसते.



