अजित पवारांच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वाखाली चौकशी करा, ममता बॅनर्जी यांची मागणी

नवी दिल्ली:- २९ जानेवारी
उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी बारामती या ठिकाणी विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान या विमान अपघाताची सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वाखाली चौकशी करावी, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममताबॅनर्जी म्हणाल्या कि इथे कोणीही सुरक्षित नाही. अजित पवार पुन्हा सक्रिय राजकारणात सहभागी होणार होते, हे मी स्वतः पाहिलं होतं. अशा परिस्थितीत हा अपघात कसा झाला?, हा गंभीर प्रश्न असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होणं अत्यावश्यक असून, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली योग्य तपास व्हावी, अशी मागणीही त्यांनीकेली.
या अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले कि आमच्या सहकाऱ्याचा जीव या विमान दुर्घटनेत गेला आहे, पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे याविमान अपघाताची चौकशी नक्कीच झाली पाहिजे, कारण यापुढे देखील अशा प्रकारच्या अपघात होताकामा नये यासाठी हे गरजेचं आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्पष्ट केलं आहेकी त्यांनी अद्याप कोणालाही समन्स बजावलेले नाहीत. या प्रकरणाचा अधिकृत तपास आताएअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे (एएआयबी) सोपवण्यात आला असून, पुढील सर्वचौकशी आणि निर्णय एएआयबी घेणार आहे.
विमान लँडिंगला अवघे काही मिनिट शिल्लक असताना हा अपघात झाल्यामुळं या अपघाताविषयी एकसंभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी एक खळबजनक दावा करणारी पोस्ट एक्सवर केली आहे. त्यांनी या अपघाता बाबत विमान कंपनी व्हीएसआरकडे बोट दाखवलं आहे.
सुहेल सेठ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘आज सकाळी जो विमान अपघात झाला ते विमान व्हिएसआरएव्हिनेशनच्या मालकीचं होतं. ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचे हे दुसरे विमान क्रॅश झाले आहे. पिता–पुत्रही कंपनी चालवतात. ते लोकांना डीजीसीए इंडिया हे आमच्या खिशात आहे असं सांगत फिरत असतात. ही चार्टर कंपनी बंद केली पाहिजे.’
दरम्यान, सुहेल सेठ यांच्यानंतर तेहसीन पुनावाला यांनी देखील ट्विट केलं, ‘अजित पवार ज्या विमानातूनप्रवास करत होते. ते विमान व्हिएसआर एव्हिनेशनचे होते. हे त्या कंपनीचे दुसरे विमान क्रॅश झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात अनेक विमाने आणि हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहेत. डिजीसीएने आता तरीयात लक्ष घालून कडक पावलं उचालावीत, असं म्हटलं आहे. या भीषण अपघाता बाबत विमान कंपनी व्हीएसआरचे संचालक विजय कुमार सिंग यांनी हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नसून, खराब हवामानामुळे धावपट्टी न दिसल्याने व वैमानिकाच्या निर्णयामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाजव्यक्त केला आहे.
सिंग यांच्या माहितीनुसार, विमानाचे लँडिंग करण्याचा निर्णय वैमानिकाचा होता. वैमानिकाने आधी रनवे २९ वरून उतरण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरल्याने त्यांनी मिस्ड अप्रोच घेतला. त्यानंतर पुन्हारनवे ११ वरून लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिकदृष्ट्या असे दिसते की वैमानिकाला धावपट्टी नीटदिसत नव्हती. हा अत्यंत दुर्दैवी निर्णय ठरला. विमान तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सुस्थितीत होते. देखभालीमध्ये कोणतीही उणीव नव्हती किंवा उड्डाणादरम्यान कोणताही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आलेली नाही, असे सिंग म्हणाले.



