पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

▫️इरफान ठरला देवदूत! पहिली विहिरीत उडी मारून ५ जणांचा जीव वाचवला
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १५ जून २६
सोलापूरच्या पंढरपुरातून अपघाताची मोठी बातमी हाती आली आहे. सोलापूरच्या म्हसवड– पंढरपूरमार्गावर तांदूळवाडी गावाजवळ टेम्पो विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामधील सर्व मृत भाविक पंढरपूरच्या रांजणी गावचेआहेत. या भीषण अपघातानंतर संपूर्ण पंढरपुरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड–पंढरपूर मार्गावरून सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवरकाळाने घाला घातला आहे. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परताना माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावानजीक एका विहिरीत टेम्पो कोसळला. टेम्पो कोसळून भीषण अपघातात ८ जणांचामृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पुरुषांसहित महिला, लहान मुलांचा देखील समावेश आहे.

नेमक्या ह्याच वेळी तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण दुचाकीवरून येत होता. टेम्पो पाण्यात पडल्याचे पाहून त्याने तातडीने गावात मदतीसाठी फोन केले. याचवेळी एक लहान बाळ पाण्यात बुडत असल्याचे पाहून तात्काळ इरफानने पाण्यात उडी घेतली आणि या चिमूरड्याला छातीशी धरून त्याच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढून त्याचा जीव वाचवला.

विहिरीत उडी मारल्यानंतर पाण्यात हालचाल दिसल्यावर आधी दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांनाही इरफानने ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढलं. इरफानने पाच जणांचे जीव वाचवले तर दोन पुरुष पोहून बाहेर आले. मात्र, हा टेम्पो विहिरीत खाली उलट्या बाजूने पडल्याने टेम्पोच्या आतमध्ये असणाऱ्या सात महिला आणि एक सहा महिन्याच्या बाळाला मात्र वाचविण्यात अपयश आल्याची खंत इरफानने बोलून दाखवलीय. वेळ काळ बनून आली होती. मात्र, इरफान देवदूत बनून आला अन् ५ जणांच्या जीवाचे रक्षण करणारा खुदाचा का फरिश्ता ठरला.
त्यानंतर मृतदेह तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातातील मृतांची नावे अद्याप हाती आलेली नाहीत. अपघातातील मृत भाविक एकाच कुटुंबातील असल्याचा दावा केला जात आहे. तांदूळवाडीत नाशिकच्या दिंडोरीसारखी घडलेल्या अपघाताची घटना घडली आहे. पंढरपुरातील या अपघातामुळे राज्यातील उघड्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



